सामाजिक

वाडेगव्हाण येथील रायजिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न


वाडेगव्हाण प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील रायजिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विस्तार अधिकारी चांगदेव गवळी केंद्रप्रमुख नारायण बाचकर अडोळे गुरुजी वाडेगव्हाण गावच्या सरपंच प्रियंका यादव, उद्योजक किशोर यादव सामाजिक कार्यकर्ते  अरुण घनवट यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात शालेय बालकलाकारांनी विविध लोकप्रिय गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटातील गाजलेले प्रसंग, भावपूर्ण अभिनय व सजीव सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण रंगून गेले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकत कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.


हा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ताथेड, कांचन ताकवणे, महेश शेळके व शहाजी देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. स्नेहसंमेलन प्रमुख सुप्रिया यादव, निलम मापारी आरती बोरगे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने उत्तम नियोजन करून कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राणीताई घावटे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सोनाली दवंडे यांनी मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून पालक व ग्रामस्थांकडून शाळेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *