सामाजिक

कापड बाजार गणेश मित्र मंडळाच्या ९९ व्या वर्षानिमित्त रक्तदान शिबिर; १३१ जणांनी दिले जीवनदान


शिरूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाणीचे जादूगार प.पू.गुरुदेव श्री रमणीक मुनीजी म.सा.यांच्या ४७ व्या दीक्षा दिनानिमित्त आणि शिरूर भूषण दानशूर व्यक्तिमत्त्व भामाशाह रसिकलालजी धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त व कापड बाजार गणेश मित्र मंडळ यांच्या ९९ वर्षानिमित्त कापड बाजार गणेश मित्र मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात १३१ जणांनी रक्तदान केले.
कापड बाजार मित्र मंडळाच्यावतीने घेण्यात आलेले रक्तदान शिबीर व राबवण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या.
शिबीरास शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे,उपनगराध्यक्ष मितेश गादिया,भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे,नगरसेवक सागर नरवडे,नगरसेवक निलेश पवार,
हिमानीश्री महाराज साहब,संघपती भरत चोरडिया,सुनील धाडीवाल,उद्योजक संदीप बिहाणी आदींनी भेट दिली.
शिरूर नगरपरिषद मंगलकार्यालयासमोर जैन पंचायत भवन येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबीरात सहभागी प्रत्येक रक्तदात्यास इस्त्री व सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शिरुर येथील ओम रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.कापड बाजार मित्र मंडळाचे प्रितेश कोठारी व पंकज कोठारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *