क्राईमराजकीय

भाजपा महिला आघाडी व ओन्ली वुमन जिमच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार


शिरूर प्रतिनिधी.  [ वेध बातमीचा ]

शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा शिरूर शहर भाजप महिला आघाडी व ओन्ली वुमन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकशाही प्रक्रियेत मिळालेल्या जनतेच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत आगामी काळात विकासाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी बोलताना भाजपा शिरूर तालुका पूर्व मंडल अध्यक्ष राहुल पाचर्णे म्हणाले की, “या निवडणुकीत भाजपने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल अकरा नगरसेवक निवडून आणले असून भाजप हा नगरपरिषदेत मोठा पक्ष ठरला आहे. जनतेने दिलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी सर्वांनी संघभावनेने काम करणे आवश्यक आहे.”
प्रास्ताविकात भाजप महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रियाताई बिरादार म्हणाल्या की, “मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रत्येक प्रभागात प्रामाणिकपणे व प्रभावीपणे काम करणे ही आपली जबाबदारी आहे. हा कार्यक्रम केवळ सत्काराचा नसून विजयाचा शपथविधी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमास भाजपा शिरूर तालुका पूर्व मंडलचे अध्यक्ष राहुल पाचर्णे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेश्मा शेख, पुणे जिल्हा भाजप महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षा वर्षा काळे, बेटी बचाव बेटी पढावच्या शिरूर तालुका अध्यक्षा कविता परदेशी, दिव्यांग आघाडीच्या नयना परदेशी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका उमेश शेळके, सागर नरवडे, संतोष थेऊरकर, अमित कर्डिले, निलेश पवार सुनिता कुरंदळे, सुनिता भुजबळ, पूजा पोटावळे, स्विटी शिंदे, रिंकू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रियाताई बिरादार, उपाध्यक्षा सुष्टी करंजुळे, मीराताई परदेशी, जयश्री थिटे, सुषमा फंड यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन निलमधु शर्मा यांनी केले.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *