सामाजिक

शिरूरमध्ये श्री शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन; प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीचा लाभ घेण्याचे आवाहन


शिरूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीमधून श्री शिव महापुराण कथेचे आयोजन मंगळवार दि. २४ पासून करण्यात आले असून, या पवित्र कथेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांनी केले आहे.
रामलिंग रोड, शिरूर (घोडनदी) जि. पुणे येथे मंगळवार दि. २४ ते २ मार्च दरम्यान दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत ही कथा पार पडणार आहे. पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


‘श्री शिव महापुराण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखविणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. या कथेमुळे भाविकांना आध्यात्मिक उन्नतीबरोबरच सकारात्मक ऊर्जा मिळेल,’ असे आयोजकांनी सांगितले.
शिरूर परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *