परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारेगाव येथे आरपीआयची महत्त्वपूर्ण तालुकास्तरीय बैठक
शिरूर प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार व पक्षाचे प्रदेश सचिव सुर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या बैठकीमध्ये निवडणूक तयारी, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी रणनीती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीचे निमंत्रण आरपीआयचे नेते राजेंद्र उबाळे, नवनाथ कांबळे, करडे गावचे उपसरपंच राजेंद्र गायकवाड, आनंद उघडे, सिद्धार्थ झेंडे व अमोल राजगुरू यांनी दिले आहे.
तरी शिरूर तालुक्यातील सर्व आरपीआय पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षप्रेमींनी या महत्त्वपूर्ण बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : अर्जुन बढे