विठ्ठल घावटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य उपक्रम: रक्तदान, नेत्रतपासणी व हृदय तपासणी शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर प्रतिनिधी :
शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच विठ्ठल घावटे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच विठ्ठल घावटे युवा मंच आणि श्री आनंदऋषी हॉस्पिटल व हार्ट सर्जरी सेंटर, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर, हृदयरोग तपासणी व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मागील नऊ वर्षांपासून शिबिराचा उपक्रम सुरू आहे
या शिबिरात ३०० नागरिकांनी नेत्र तपासणी, १९५ नागरिकांनी रक्तदान, तर ६० नागरिकांनी हृदय तपासणी करून घेतली. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्यसेवा उपक्रमामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची सुविधा मिळाली.

माजी सरपंच विठ्ठल घावटे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यात जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे शिरूर तालुका भाजपाचे अध्यक्ष राहुल पाचर्णे शिरूर तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, विक्रम पांचुदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शाशिकांत दसगुडे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष नामदेव घावटे, माजी उपसभापती दादा पाटील घावटे भाजपाच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा वर्षा काळे, माजी नगरसेवक प्रविण दसगुडे, सुभाष जगताप, शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, उपसरपंच सचिन घावटे, माजी सरपंच अरुण घावटे, राळेगण थेरपाळचे सरपंच पकंज कारखिले, भाजपा शिरूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियाताई बिरादार माजी उपसरपंच बाबाजी वर्पे, संजय शिंदे, भरत बोऱ्हाडे, ॲड. शिवशंकर हिलाळ ग्राहक मंचचे दिनकर साबळे अशोक शेळके सर यांचा समावेश होता. अनेक नागरिकांनीही प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर यांना धर्मिक व समाजप्रबोधन कार्यासाठी ट्रॉफी देऊन विशेष सन्मान करण्यात आला

या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. स्वप्निल शिंदे, डॉ. किरण कवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच सागर घावटे, विजय खोसे, नामदेव घावटे, बापू गाडेकर, प्रविण घावटे, रामदास कळमकर यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत उपक्रम सुरळीत पार पाडला.

मुख्य संपादक : अर्जुन बढे
