तालुका स्तरीय विज्ञान–गणित प्रदर्शनात गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल वाडेगव्हाणचा तृतीय क्रमांक
वाडेगव्हाण प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील श्री संत निळोबाराय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुका स्तरीय विज्ञान–गणित प्रदर्शनात गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, वाडेगव्हाणच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी “अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत” या विषयावर आधारित प्रभावी उपकरण सादर करून परीक्षकांची प्रशंसा मिळवली. या यशाबद्दल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अहिल्यानगर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी बुगे सर, गटशिक्षणाधिकारी ढवळे सर, विस्तार अधिकारी गवळी सर व अहिरे सर (प्राचार्य) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या उपक्रमासाठी मार्गदर्शन श्रीमती सोनाली दवंडे यांनी केले. प्रदर्शनात सहभागी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
पार्थ घनवट, विराज ताकवणे, प्रतिज्ञा यादव, इरीशा मुरवदे, वीरा घनवट आणि काव्या शेळके.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सरपंच किशोर यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण आबा घनवट, शहाजी देशमाने सर, दिपाली ताथेड, कांचन ताकवणे आणि सोनाली शेळके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : अर्जुन बढे
