“स्व. आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कार्यधारेने प्रेरित होऊन निवडणूक लढवणार – राहुल पाचर्णे”

शिरूर प्रतिनिधी
स्व.आमदार बाबुराव पाचर्णे साहेब यांच्या विचारांचा वारसा आणि समाजाभिमुख कार्यपद्धती अविरतपणे पुढे नेण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल पाचर्णे यांनी स्पष्ट केले. शिरूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षापदाच्या भाजपा उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे यांच्या प्रचार रॅलीवेळी ते बोलत होते.
यावेळी पदयात्रेत उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.भाजपचे शिरूर तालुका माजी अध्यक्ष भगवानराव शेळके, माऊली बहिरट, सागर फराटे, माजी नगरसेवक संदीप गायकवाड, भाजपा महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार, उपाध्यक्षा सुष्टी करंजुले तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार उमेश शेळके, रिंकू जगताप, करण खांडरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राहुल पाचर्णे म्हणाले, “स्व.आमदार बाबुराव पाचर्णे साहेब यांनी समाजहितासाठी जी विचारधारा आणि कार्यशैली राबवली, ते पुढे नेणार आहोत.शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देणे आणि भाजपा पक्षाच्या माध्यमातून शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास साधणे आणि सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत समाजहित साधुन त्यांचा लाभ मिळवुन देणे हाच निर्धार असुन भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे व सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून शिरूर नगरपरिषदेची सत्ता भाजपच्या हाती देण्याचे आवाहन शिरूर तालुका भाजपाचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांनी केले.

मुख्य संपादक : अर्जुन बढे
