राजकीय

“प्रचारासाठी फक्त एक डिसेंबरपर्यंत परवानगी : निर्णय अधिकारी जगताप”


शिरूर प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने दिलेल्या नव्या निर्दशानुसार निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवार दिनांक 1 डिसेंबर पर्यंत करता येईल मतमोजणी बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिरूर नगरपरिषद नवीन इमारतीमध्ये होणार आहे 36 मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे तसेच १2 टेबलवर प्रभाग निहाय मतमोजणी होणार असून त्याच वेळी नगराध्यक्षपदाचीही मोजणी होणार आहे मतमोजणी तीन तासातच होऊन पूर्ण निकाल जाहीर करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांनी सांगितले आहे मतदान केंद्रावर योग्य ती खबरदारी घेतली जाणार असून विविध थिम तयार करण्यात येणार आहे
निवडणूक प्रचारासाठी लावण्यात आलेल्या फलका मधून नगरपालिकेला चार लाख 70 हजार रुपयांचे शुल्क मिळाले आहे एकूण ५२७ फलकांची नोंद आहे तसेच निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत 44 लाख 96 हजार रुपयांचा टॅक्स वसूल झाल्याचे जगताप यांनी सांगितले नागरिकांना निवडणूक कालावधीत काही तक्रार असल्यास १८००२३३१२३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल यावेळी नगरपालिका प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *