सामाजिक

आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती साठे यांचा भव्य सत्कार


शिरूर प्रतिनिधी [ अर्जुन बढे ]
शिरूर शहरातील रामलिंग रोड येथील आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने शिरूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती चेतन साठे यांचा नुकताच सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत समाजकार्याची भक्कम वाटचाल करणाऱ्या स्वाती साठे यांच्या निवडीबद्दल महिला मंडळाने त्यांचा सन्मान करून अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला ढवळे उपस्थित होत्या. यावेळी प्रीती रत्नपारखी, सुजाता व्यवहारे, शोभा व्यवहारे, विजया लोखंडे, मीना इंगळे, फराना शेख, जगताप ताई, श्रीवास्तव भाभी, सविता देवी, चंदा देवी, अन्नपूर्णा इंगळे यांच्यासह परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती साठे यांनी महिलांच्या समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, सुरक्षा तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांसाठी असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी स्वाती साठे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सत्कार समारंभ महिलांमधील एकोपा व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *