राजकीय

प्रभाग ३ मध्ये सुनिल जाधवांचा वाढता प्रभाव


शिरूर प्रतिनिधी :
शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असताना प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आमदार माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानिक पातळीवरील वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

माऊली कटके यांनी प्रभागातील विविध भागांत भेट देत घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी कटके यांच्यासमोर स्थानिक प्रश्न, सुविधा आणि विकासाच्या अपेक्षा मांडल्या. कटके यांनी प्रत्येक मागणीचे गांभीर्याने नोंद घेत विकासकामांना वेग देण्याचे आश्वासन दिले. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांचा या प्रचारात मोठा सहभाग दिसून आला.

प्रभाग ३ मधील राष्ट्रवादीच्या प्रचारात सुनिल जाधव मध्यवर्ती भूमिका बजावत असून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दमदार जनसंपर्क मोहीम उभी केली आहे. जाधव यांच्या टीमने प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे नियोजन राबवले असून सकाळपासून रात्रीपर्यंत सतत प्रचार सुरू असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, नागरिकांनी जाधव यांच्यावर टाकलेला विश्वास आणि त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे प्रचार आणखी जोम धरत आहे.

स्थानीय मतदारांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांबद्दल वाढता सकारात्मक कल हा त्यांच्या कामांवरील विश्वासामुळे निर्माण झाल्याचे निरीक्षण कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता तसेच सुविधा विकासाबाबत पक्षाने केलेली कामे आणि आगामी नियोजन नागरिकांना भावत आहे. विशेषतः महिलांनी आणि तरुणांनी व्यक्त केलेला विश्वास हा या निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाचा घटक ठरत आहे.

युवा मतदार राष्ट्रवादीच्या बाजूने मोठ्या संख्येने उभे राहत असून प्रभागातील युवकांच्या अडचणी, शिक्षण–रोजगार विषयक चर्चांमध्ये कटके यांनी दाखविलेली समजूतदार भूमिका त्यांना भावत आहे. त्यासोबतच समाजातील विविध घटकांशी जुळवून घेत केलेला संवाद हा पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेला बळ देत आहे.

प्रभाग ३ मध्ये सुरू असलेल्या वाढत्या उत्साहातून राष्ट्रवादीचा प्रचार अधिक जोमात असून येत्या काही दिवसांत हा उत्साह आणखी वाढण्याची शक्यता आहे.


वेध बातमीचा

मुख्य संपादक : अर्जुन बढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *